Thursday, 15 December 2011

तु आणि मी...!

तुझा चेहरा हसरा असेलही,
तुझ्या डोळ्यात आसमंत दिसेलही,
फुलातही असशील कळीसारखी कधीतरी,
लाजतही असशील कधीतरी,
नाकही तू मुरडत असशील,
नजरेनं हजारोंना घायाळही करत असशील...

तूच तुझ्यात कधीतरी हरवली असशील,
तूच तुला आरश्यात पाहून भारावली असशील,
प्रेमाचा अंकुर तुझ्याही मनात कधीतरी फुलाला असेल,
तुझ्याही स्वप्नात कोणी खास राजकुमार असेल...!

तसा मीही काही कमी नाही,
माझे हि जीवन राजकुमारा पेक्षा वेगळे  नाही,
मीही भरारी मारतो उंच आकाशात,
मीही गुंततो कधी कधी माझ्याच विचारात,
माझ्याही हातावर कोणाच्या तरी रेषा लिहिल्या आहेत ,
मनाला न पटणाऱ्या प्रेमाच्या अशा व्यथा आहेत..!

मी जरी तुझा खास मित्र असेल,
तुझ्या हि स्वप्नात मी कधी स्थान मिळवले असेल,
माझ्या साठी तुही कधी तरी गाणे गायले असेल,
मीही तुला कधी तरी हसवलेही  असेल,
मीही आणेन तुझ्यासाठी चंद्र तोडून,
मीही देईन तुला ताऱ्यांचा गजरा करून...!

एकदा तरी माझ्या वाटेवर तू चालशील,
माझ्या बरोबर माझ्यात मिसळशील,
एकदा तरी माझा हात तू हातात घेशील,
उशिरा का असेना पण तू जरूर माझी होशील...!

Thursday, 8 December 2011

बर वाटत ना आपलं म्हणून कोणी असणारं...!

बर वाटत ना आपलं म्हणून  कोणी असणारं ,
आपल्या बाजूस कोणी  बसणारं ,
आपल्याशी खूप खूप गप्पा मारणारं,
आपल्यावर स्वतः पेक्षा जास्त  प्रेम करणारं...!

बर वाटत ना आपल्यासाठी कोणीतरी डब्बा भरून आणणारं ,
आपल्यासाठी कुठेतरी वाट पाहत थांबणारं ,
आपण केलेली  खोडी चुपचाप सहन करणारं,
आणि आपणास कायम सांभाळून घेणारं...!

बर वाटत ना आपलं नाव  कोणीतरी हातावर  लिहीणारं ,
आपल्याला स्वप्नात पाहून गालात हसणारं ,
आपण रडताना आपल्यासाठी खांदा पुढे  करणारं,
आणि आपण हसताना आपल्या बरोबर हसणारं...!

बर वाटत ना आपल्या साठी कोणीतरी झुरणारं,
आपल्या सुखात त्याचा आनंद लुटणारं,
 दुखात आपला वाटेकरी असणारं ,
आणि आपल्यावर आपल्या पेक्षा जास्त हक्क सांगणारं...!

ते कोणी  इतके हवे हवेसे कसे वाटावे ,
त्या कोणी विचारात येऊन रडायला का लावावे,
ह्या हृदयाला त्या कोणाची एवढी ओढ का असावी,
ह्या वेड्या मनाला त्याची  एवढी गरज  का वाटावी...!

Tuesday, 29 November 2011

ती आणि तीच...!

तिच्या  साठी  मी  झुराव  तरी  किती ,
तिच्या  साठी  मी  तडपाव  तरी  किती ,
तिला  न  बोलता ,न  सांगता ,
तिच्या  साठी  मी  मराव  तरी  किती ...!

तिच्यासाठी  ह्या  डोळ्यांना  रड्वाव  तरी  किती ,
तिच्या  साठी  ह्या  श्वासाला  अडवाव  तरी  किती ,
तिच्या  एका  हाकेला  अमृत  मानणारा  मी ,
ह्या  अमृता  साठी  तरसणार  तरी  किती ...!

तिच्या  डोळ्यातच  आसमंत  बघणारा  मी ,
तिच्या  शब्दात  स्वर्ग  अनुभवणारा  मी ,
तिच्या  शिवाय  विचारात  हि  दुसरे  काही  नाही ,
तिच्या  विचारांना  शब्दात  गुंफावे  तरी  किती ...!

तीच  जणू  माझ्या  नसात  वाहत  आहे ,
तीच  माझ्या  प्रत्येक  अणु रेणूत  आहे ,
तीच  माझ्या  वर  राज्य  करत  आहे ,
तिची  हि  हुकुमशाही  सहन  करावी  तरी  किती ...!

अता ती  नाही  मिळाली  तरी  चालेल ,
ती  माझ्या  आयुष्यातून  हरवली  तरी  चालेल ,
तिच्यावर  माझा  हक्क  तरी  काय  पण ,
तस तिच्या  शिवाय  मी  जगणार   तरी  किती...!

Tuesday, 18 October 2011

वाट पाहत आहे ...

वाट  पाहत  आहे ...

प्रिये  ये  ना माझ्या  बरोबर ,
माझी  साथीदार  बनून ,
माझे  डोळे  आता  पाणावले  आहेत ,
मी  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!
रात्रीला  दिवसाची  ओढ  असेल  हि ,
चंद्राला  ताऱ्यांची  सोबत  असेल  हि ,
पण  मला  आता  हृदयात  काही  टोचत  आहे ,
माझे  हृदय  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

तू  होतीस  तर  माझे  ओठ  थरथरत  न्हवते ,
माझा  श्वास  कधी  तुटत  न्हवता ,
मीही  कधी  हसायला  विसरलो  न्हवतो ,
माझे  जुने  हसणे  आता  मला  जमतही नाही ,
ते  हसणे  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

तू  मला  जगायला  हि  शिकवले  होतेस ,
आणि  तूच  मला  स्वप्न  हि  पाहायला  शिकवले  होतेस ,
तूच  माझे  भास  होतीस  आणि  तूच  माझी  सावली  हि  होतीस ,
माझी  तीच  सावली  आता  माझ्या  जवळही  फिरकत  नाही ,
हि  सावली  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

प्रिये  ये  ना  माझ्या  बरोबर ,
माझी  साथीदार  बनून ,
माझ्या  डोळ्यात  आता  अश्रू ही  साठत  नाही ,
गालावर  सध्या  रडण्याच्या  खुणा  हि  होत  नाही ,
आता  मी  तुझ्या  आयुष्यात  नसेल  हि ,
पण  फक्त  मला  जागवायला  तरी  येशील  ना ...
सांग    ना ...!

Friday, 16 September 2011

तुझे आणि माझे नाते काय ?

तुझ्या  श्वासातला  आर्धा  भाग  माझा ...आणि  माझ्यातला  तुझा ...
माझे  काय  आणि  तुझे  काय ...दोघांच्या  सोबत  जगण्याला  आर्थ ...
ह्या  अर्थाचे  महत्व  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

तुझे  आणि  माझे  भाग्य  एका  रेषेवर ...
फरक  फक्त  एवढाच ...तुझे  नि  माझे  हात  वेगळे  वेगळे ...
आशय  फरकांचे  मोजमाप  ते  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

तुला  काही  लागले  कि  माझे  रक्त  वाहत  असते ...
मला  आनंद  झाल्यावर  तुझ्या  गालावर  हसू  येते ...
सुख  दुखत  समान  हेच  ते  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

तुझी  आणि  माझी  वाट  तर  वेगळी  वेगळी ...
कुणास  ठाऊक  ती  कशी  जुळली ...
पण  ह्या  संगमाचे  कारण  काय ?
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

कधी  मी  रडणार  कधी  तू  रडणार ...
पण  रडताना  डोक  ठेवण्यासाठी  खांदा  एकमेकाचा  असणार ...
नंतर  तुझे  व  माझे  डोळे  पुसताना  तुला  वा   मला  पडणारा  एकच  प्रश्न ...
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

नाते  तर  तसे  साधे  सरळच ...प्रेमाचा  दोघानाही  गंध  नाही ...
प्रेम  काय  असत  हे  माहित  होण्या  आधीच ...
शब्द  ओठांवर येण्या  आधीच ...
ह्या  नात्याला  फुटलेत  पाय ....!

आता  विचारू  तरी  कसे  कि ...
तुझे  नि  माझे  नाते  काय ?

Wednesday, 7 September 2011

पप्पा सांगा ना ...!

एका  मुलाने  त्याच्या  वडिलांना  विचारलेला  प्रश्न  ज्याचे  उत्तर  त्याच्या  वडिलानकडे  नाही ...!
पप्पा  सांगा  ना ...!
मला  तुमच्या  बरोबर  खेळायचे आहे ...
मला  तुमच्या  बरोबर  खूप  गप्पा  हि  मारायच्या  आहेत ...
पण  तुम्हाला  मुळी  वेळच  नाही ...
पप्पा  सांगा  ना तुम्हाला कधी  वेळ  मिळणार ...?


मी  तुम्हाला  खूप  दिवस  झाले  पहिलेच  नाही ...
आई तर  मला  रोजच  सांगते  कि  आज  तुझे  पप्पा  लवकर  यातील ...
पण  तुम्ही  कधी  लवकर  येताच  नाही ...
पप्पा  सांगा  ना  कधी  परत  येणार ...?

मला  परत  तुमच्या  खांद्यावर  डोके  ठेऊन  एकदा  रडायचे  आहे ..
परत  तुमचा  हात  हातात  घेऊन  एकदा  निश्चिंत  पणे  फिरायचे  आहे ...
पण  ते  शक्य  नाही  कारण  तुम्हाला  सुट्टी  मिळत  नाही ...
पप्पा  सांगा  ना तुम्हाला  सुट्टी  कधी  मिळणार .. .?

मला  माहित  आहे  कि  तुम्ही  एवढे  काम  माझ्या  साठीच  करत  आहात ...
मला  कुठली  हि  कमी  पडू  नये  म्हणून ...
पण  पप्पा  खरच  माझी  गरज  तुमच्या  पेक्षा  जास्त  मोलाची आहे  का ...?
पप्पा  सांगा  ना  खरच  माझी  गरज  मोठी  आहे  का ...?

मला  तुम्ही  हवे  आहात ...पैसा  काय  कोणीही  कमावतो ...
तुम्हाला  वाटते  कि  जे  तुम्ही  सहन  केले  ते  मी  सहन  करू  नये ...
पण  मी  जर  ते  सहन  केले  नाही  तर  मी  तुमच्या  सारखा  बनेन  का ?
मला  तुमच्या  सारख  व्हायचे  आहे ...
मग  मी  बनेन  का  तुमच्या  सारखा ?

पप्पा  सांगा ... ना ....?

Monday, 29 August 2011

Freedom

F-Freedom for All Animals Like
R-rats(ते  जे  ह्या  देशाला  कुरतडत  आहेत ),
E-eagles(ते  जे  ह्या  देशाची  हालत  आभाळातून  पाहत  आहेत ),
E-elephants(ते  जे  ह्या  गरिबीत  हि  पोट  भरून  खात  आहेत ),
D-dogs(ते  जे  ह्या  समजा  समोर  फक्त  भुकत  आहेत ),
O-Ox(ते  जे  धर्माच्या  आड  राहून  सोडलेल्या  बैला  सारखे  माजले  आहेत ),

&
the Most important(आणि  सर्वात  महत्वाचे ),

M-(may Be)Men and Women(ते  जे  ह्या  प्रत्येक  प्राण्या  खाली  चिरडले  जात  आहेत ...!)

so think about it...!!

you are from which category?

तू ...आणि माझे मन

मी  माझ्या  शब्दांच्या  जाळ्यात  अडकलो  असताना ,
तुझ्यात  कसा  आडकलो  देव  जाने ...!
आणि  हळू  हळू  माझे  शब्द  हि  तुझ्या  साठीच  निघत  होते ...!

तू  एक  दिवशी  अचानक  समोरून  येताना  दिसलीस ...
हवेचा  प्रवाह  बदलला ...
कुणास  ठाऊक  एक  वेगळाच  सुगंध  येत  होता ...!
येणारे  वारे  हि  तुझीच  येण्या  ची  बातमी  देत  होते ....!

तू  चालत  असताना  तुझ्या  पायातील  ते  पैंजण ..
एक  वेगळाच  नाद  ऐकवत  होते ...
तो  नाद  येवढा  स्पष्ट  होता  कि ...
एवढ्या  गर्दीतील  गोंगाटात  तो  नाद  माझ्या  पर्यंत  येत  होता ...!

तू  जवळून  गेलीस  आणि ...माझ्या  कडे  पाहिलेस ...
अन , आणि  काय  तुझे  ते  मोहक  से  हास्य  पाहून ...
तर  मी  अर्धा  स्वर्गात  पोहोचलोच  होतो ...
पण  पुन्हा  खाली  यावे  लागले  कारण  खाली  तू  होतीस  ना ...!

तुला  समोर  पाहतो  आणि  माझे  शब्दच  फुटत  नाहीत ...
मनात  तर  विचारांचे  काहूर  उठते ...
पण  तेच  आधी  तोंडावर  येत  नाहीत ...
तुला  काही  बोलले  तर  तू  दुखावशील  म्हणून  मी  काही  बोलत  नाही ...!

तू  इतकी  माझ्यात  सामावली  आहेस ...
कि  माझा  श्वास  हि  तुझ्या  साठी  असल्याचा  मला  भास  होत  असतो ...
मी  जगतो  हि  तुझ्या  साठीच  आणि  मारणार  हि  तुझ्या  साठीच ...
तुझ्या  शिवाय  हे  जग  नश्वर  असल्याचा  मला  भास  होतो ...!

आणि  मग  हळूच  मी  गालात  हसतो  आणि  मग  मनातून  आवाज  येतो ...
.
.
.
Hey dont be serious i m just joking....!

आणि मला कळले ...

एक  दिवस  उगवला  जसा  रोजच  उगवतो ...
आणि  सूर्य  हि  तसाच  आग  ओकत  होता ...
आणि  त्या  सूर्य  कडे  पाहून  मला  कळले ...
कि  हा  कितीही  बोललो  तरी  चांदणे  तर  पसरवणार  नाही ...

त्याच  दिवशी  आवरून  बाहेर  पडलो ...
देवा  आजच  दिवस  जरा  चांगला  जाऊ  दे  असे  मनात  म्हटलो ...
आणि  तितक्यात ढोकर  लागली  आणि  तेव्हा  मला  कळले ...
देव  हि  काही  घेतल्या  शिवाय  कोणाला  काही  देत  नाही ...

ती  ढोकर  पचवत  जरा  कुठे  पुढे  आलो ...
तर  तेव्हड्यात  पावसाने  माझी  थत्त  करावी  तसा  बरसला ...
आणि  जवळून  जाणाऱ्या  गाडीने  अंगावर  उडवलेल्या चिखलाला  पाहत  मला  कळले ...  
कि  पाऊस  आणि  चीक्खल  आपल्यावर  कधीही  बरसू  शकतो ...

तसाच  भिजत  गाडी  काढून  कामावर  तर  आलो ...
पण  तेव्हा  मला  अचानक  आठवले कि  आपण  महाराष्ट्रात  राहतो ...
light  गेलेली  पहिली  आणि  मला  कळले ...
कि  महाराष्ट्र  एक  दिवस  mahan  राष्ट्र  तर  बनेन  पण  विजे  शिवाय ...

विजे  शिवाय  मी  काहीही  करू  शकत  नाही  म्हणून  बाहेर  पडलो ...
आणि  तसा  मी  हुशार  पण  कुठून  डोक  चालाल  आणि  मित्राची  गाडी  घेतली ...
आणि  जरा  दूर  जाऊन  ती  बंद  हि  पाडली  ती  बंद  झाल्यावर  मला  कळले ...
मित्र  कितीही  खास  असला  त्याला  जीवापाड  प्रिय  असलेली  गाडी  आपल्या  सारख्याला  कधी  साथ  देणार  नाही ...

आता  माझ्यावर  गाडी  ढकलण्याची  वेळ  आली  होती  आणि  मी  ती  वेळ  पार  हि  पडत  होतो ...
आणि  खरच  दिवस  चांगला  उगवला तर  होता  ना ह्या  विचारात  गाडी  दुरस्त  हि  केली ...
आणि  खूप  विचार करून  झाल्यावर  मी  एका  शेवटच्या  निष्कर्षावर  पोहोचलो ...
कि  आपण  जरी  रोज  अंघोळ  करून  निघालो  तरी  सर्व  दिवस  सारखे  नसतात ...


कधी  दिवस  चांगला  आणि  कधी  वाईट  नाही  थोडाच  वाईट  हि  उगवतो ...
पण  ते  दिवस  जगता  जगता  काही  तरी  शिकायचं  प्रयत्न  ठेवा ...
नक्की  दिवसाच्या  अंती  आपण  आज  समाधानी  आहोत  याचा  आभास  होतो ...
आणि  रात्री  चांगली  झोप  लागते ...आणि  आपण  झोपतो  ते  उद्या  पुन्हा  चांगला  दिवस  उगवणार  ह्या  आशेने ...


आज  झालेल्या  प्रसंगावर  आधारित ....माझी  कविता

ratra tar ata kuthe chalu hot ahe...

ratra atach kuthe ugavat ahe...
ata kuthe suryala gilanara andhar paarat ahe...
ata kuthe athng samudrala bharati yet ahe...
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

ata kuthe ratrani cha vaas daravalat ahe...
ata kuthe shaharala gadh zop yet ahe...
ata kuthe zade shwas ghet ahet...
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

ratricha kala rang ata kuthe gahira hot ahe...
sakalpasun chi udaleli dhul ata kuthe shant hot ahe...
gadyanchya carbon che astitv ata kuthe janavat ahe...
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

daru chya dukanat ata kuthe gardi hot ahe...
ata kuthe nashela rang yet ahe...
darucha ata kuthe ekhada bali gela ahe...
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

ata kuthe bhik maganare shant visavale asatil...
fekalelya jevanane aaple pot bharat asatil...
ata kuthe aayushyala shivya dyayala survat keli ahe...
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

jara aandhana bare vatat asel...
aapale kayamache dukh itar sarv anubhavatana manatun hasat asatil...
ata kuthe tyana hasayacha aanand milat ahe..
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...

mi hi asach divas ugavayachi vaat pahat ahe...
divasa yenarya sankatanchi vaat pahat ahe...
manatu tyana samore janya sathi bal hi jamavat ahe...
ani manala patavun hi det ahe...ki,
ratra ajun sampali nahi,ratra tar ata kuthe chalu hot ahe...!

tar tumhi mele ahat...

jar tumhi hya jagat shwas gheu shaktat...
jar tumhi hya gardila sahan karu shaktat...
jar tuhi hya asankhya dokyan madhale ek doke ahat
tar tumhi mele ahat...

jar tumhi hya jagat honara anyay nimutpae aiktat...
jar tumhi hya jagat sarv aikun ghetat...
jar tumhi hya jagat sarv manat theu shaktat...
tar tumhi mele ahat...

jar tumhala gharchyansathi vel deta yet nasel...
jar tumhala prem dyayala tar sodach...
pan prem karayala hi jamat nasel....
tar tumhi mele ahat....

jagnyacha anand kashyat he jar tumhala mahit nasel...
chotya chotya goshtitala aanand gheta yet nasel...
jar tumhala swata varatich vishwas nasel....
tar tumhi mele ahat...


jaga hasat hasat jaga...
pan kadhi kadhi radanyacha aanand ghyayala visaru naka...
jaga thode swachhand houn jaga...
pan jagatana thodi jabbdarihi balaga...

jaga punha utha ani jaga...
jara hya pinjaryatun baher pada ani ek mukt shwas ghya...
jara hya zada-fulanpramane dusaryala kahi tari denyachi tari theva...
ani bagha tumach aayushya jarur badalel....

are shevati marayache tar sarvana ahe pan...
jase aapan janmala alyavar sarv hastat ani aapan radat asato...
asech aapan jatana hasat jave ani baki sarvani radave...
ase kahi tari karun mara...



Majhi Kavita(Amol Patil23-07-2011)

देवा तू फक्त साथ दे ....

कोमेजानाऱ्या कळीला  जगण्याची  ओढ  दे ....
गळणाऱ्या पानाला वाऱ्याचा प्रवाह  दे ....
अथांग  समुद्राला  एक  शांत  किनारा  दे ....
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....


पेटनाऱ्या  पानातील  आग  सहन  करण्याची  ताकत  दे ....
सूर्यात  चमकणाऱ्या  आकाशाला  थोडीशी  शांत  सावली  दे ....
सूर्याला  सुद्धा  चांदण्याची  मौज  मिळू  दे ....
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....


रात्रीत  शांत  झोपेसाठी  डोळ्यात  सुंदरशे  स्वप्न  दे ....
हसत  हसत  जगण्यासाठी  मनात  थोडे  हसू  दे ....
कधी  कधी  रडण्यासाठी  भक्कम  असा  खांदा  दे ....
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....

प्रेमाचा  अर्थ समजावा  म्हणून  आईचा  तो  पदर  दे ....
जबाबदारी  सांभाळणारे  वडिलांसारखे  हाथ  दे ....
हसत  हसत  डोळ्यात  पाणी  आणणारे  भावा/बहिणीचे  ते  नाते  दे ....
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....


कधी  कधी  रडवून  हसवणारे  आठवणींचे  ओझे  दे ...
कधी  कधी  मोठ्यांना  थोडेसे  लहानपण  दे ....
मस्करी  करून  पण  हसवणारे  मैत्रीचे  बंध  दे ....
डोळ्यात  बसणारी ,हृदयात  राहणारी  प्रेमाची  गाठ  दे ...
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....

खरच  काही  देत  असशील  तर  शेतकऱ्याला  पाणी  दे ....
खरच  काही  देत  असशील  तर  मारणार्याला  एक  सुखाचा  श्वास  दे ....
खरच  काही  देत  असशील  तुझे  अखंड  नाम  मुखात  दे ....
हे  हि  जमत  नसेल  तर ,
देवा  तू  फक्त  साथ  दे ....

ajun hi sarv tasach ahe....

Ajun hi sarv tasach ahe...
ajun hi surya purvekadech ugavato ahe..
ajun hi chandra tyache chandane ratri pasaravato ahe..

farak fakt yevadhach suryachya unhacha tras sharirala sahan hot nahi,
ani chandrache chandane lightichya jalyat disat nahi..

ajun hi sarv tasach ahe...
ajun hi samudrala bharati yete..
ani ajun hi nadi samudralach jaun milate...

farak fakt yevadhach ata samudrachya bharati la kadhi sunami mhantat,
ani nadi nusatich panya vina samudrachi sath dete..

ajun hi sarv tasach ahe...
ajun hi gulabachya zadala gulabhachich fule yetat..
ajun hi parijatakachi fule dusaryachya daratach padatat..

farak fakt yevadhach ata gulabala tasa sugandh rahila nahi,
ani parijatakala tasa maan hi rahila nahi..

ajun hi sarv tasech ahe...
ajun hi padavyala tilgul vatatat...
ajun hi diwali la navin kapade ghetat...

farak fakt yevadhach ata tya tilgulat to godawa nahi..
ani diwalit kapade kharedi karnya itaka bonus milat nahi.. 

ajun hi sarv tasech ahe...
ajun hi chukun konala pay lagala ki hath mafisathi pudhe hotat..
ajun hi aathvani jagya zalyavar dole ole hotat...

farak fakt yevadhaach ata mafisathicha shishtachar kami ahe...
ani ole zalele dole lapavanyasathi krutrim paus padat ahe...

ajun hi sarv tasach ahe...
ajun hi mitrala aapan bhauch manato..
ajun hi aaila aapan aare turech karato..

farak fakt yevadhach ata mitra la aapan 'Dude' mhanto,
ani nantar kadhitari tyachyach aaila shivyahi ghalto..

ajun hi sarv tasach ahe...
ajun hi premachi paribhasha eka mulipasunach suru hote..
ajun hi premat haar jastkarun jativarunach hote..

farak fakt yevadhach ata mulgi mulacha paisa pahun prem suru karte..
ani mulga hi tashyach kahishya mulihya shodhat asato ...

ajun hi sarv tasach ahe...
ajun hi premache shabd adichach ahet...
ajun hi premat bhandan ahet...

farak fakt yevadhach ata premasarakh premat kahi ural nahi...
ani premat bhandan zalach tar samajavanyasarakhe kahi uratach nahi...

ajun baki ahe nantar purn karen...
--majhi kavita...Amol P.Patil

आमच्या ह्या देशातील एक एक रंग तसा न्यारा आहे ...

आमच्या  ह्या  देशातील  एक  एक  रंग  तसा  न्यारा  आहे ,
कोणी  भगवा  पकडला  तर  दुसरा  हिरवा  पकडत  आहे ..
कोणी  गुलाल  उडवला  तर  दुसरा  फटाके  उडवत  आहे ..
पूर्ण  देश  जिथे  रंगत  भिजत  आहे ..
तिथे  कोणी  तरी  हळूच  लपून  दुसर्याचे  रक्त  हि  लाल  रंग  म्हणून  उधळत  आहे ..

आमच्या  ह्या  देशातील  प्रजा  काही  औरच आहे ,
मदतीच्या  हाताला  कापणारी  तालावर  यांच्या  हातात  आहे ..
किंचाल्यांच्या  ह्या  देशात  साऱ्यांच्या काळजात  दगड  आहे ..
कोणी  मारताना  पाहून  हा  आपला  कोण  म्हणून  पुढे  जाणारी  हि  जनता  आहे ...
आपले  कोणी  मेल्या  नंतरही  त्याला  दोन  दिवसात  विसरणारी  हि  प्रजा  आहे ...

आमच्या  ह्या  देशातील  नेता  खरच  तसा  न्यारा  आहे ,
एखाद्या  संग्रहालयात  ठेवावा  तसा  तो  गोल  माटोळ  आहे ...
अंगावरती  पांढरे  कपडे  आहेत ,कदाचित  मानाने  हि  तो  पांढरा आहे ...
फक्त  परिस्थिती  त्याला  खायला  लावते  आणि  तो  खात  आहे ...
समाजाचे  उष्टे   उरलेले  खायला  तर  तो  नेता  आहे ...

भूक  लागते  म्हणून  दुसऱ्याच्या ताटात  वाकून  त्याचे  पैसे  हि  हा  खातो ...
खाऊन  खाऊन पोट  भारत  नाही  म्हणून  देश  ला  हि  पिळून  खातो ...
खात  खात  इतका  वाढला  तरी  हे  खातच  जात  आहे ...
आमच्या  ह्या  देशातील  नेता  खरच  तसा  न्यारा  आहे ...
कितीही  मोठा  असला  तरी  आम्हा  तो  प्यारा  आहे ...

कसा  हि  असला  आमचा  देश  तरी  तो  आमच्या  साठी  खास  आहे ..
नाजूक  जरी  असले  त्याच्याशी  नाते  तरी  विश्वास  माझा  पक्का  आहे ...
कितीही  अडचणी  आल्या  तरी  घटत  उभे  राहणे  हा  आमचा  धर्म  आहे ...
प्रेमाने  समजत  नसेल  तर  कापून  हि  समजावणे  आम्हा  शक्य  आहे ...
आमच्या  ह्या  देशातील  एक  एक  रंग  तसा  न्यारा  आहे ,
कितीही  असले  तरी  आमुचा  भारत  महान  आहे ...!

आई तू खरच खुश आहेस का ?

तू  जेव्हा  जन्माला आली  आसशील ,
खूप  रडली  असशील ,
आणि  खूप  हसली  हि  असशील ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना..."
आता  विचारतो  सांग ना
आई  तू  खरच   खुश  आहेस  का ?

तू  जेव्हा  थोडी  मोठी  झाली  असशील ,
तू  थोडे  जग  ह्या  डोळ्यात  साठवत  असशील ,
आणि  काही  विसरत  हि असशील ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?

तुला  अजून  काही  वर्षाने  कळले  असेल ,
आपल्या  पेक्षा  आपल्या  भावाला  जास्त सुख  मिळेल ,
आणि  कधी  तुही  काही  त्याला  तुझ्या  कडून  दिले  असशील ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?

तुझे  नंतर  लग्न  ठरले ,
तुझे  पुढचे  आयुष्य  रचायला  कोणी  नवीनच  आले ,
तू  तर  तुझ्या  आई  वडिलांकडे  बघून  लग्नाला  हा  केलेस ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?


अजून  काही  वर्षांनी  तुझ्या  आयुष्यात  मी  आलो ,
मला  बघून  तू  हसत  होतीस ,
छातीला  लाऊन  मला  मिरवत  होतीस ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?

तू  मला  9 महिने  पोटात  वाढवले ,
तुझ्या  जेवणाचा   काही  भाग  मला  दिलास ,
तू  जागी  राहिलीस  पण  मला  झोपवलस,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?

अजून  काही  वर्षांनी  मी  थोडा  मोठा  झालो ,
माझ्या  आयुष्यात  जिथे  तुझा  पहिला   मान  होता ,
तो  मी  कोण  दुसरीला  दिला  तू  ते  पाहून  फक्त  हसलीस ,
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खरच  खुश  आहेस  का ?

पण  आता  मला  जरा  वाईट  वाटते ,
जीवाची  हूर -हूर  चालूच  राहते ,
मी  माझे  आयुष्य  सुधारावन्या  साठी  तुझ्या  पासून  दूर  झालो ,
तू  मला  जाताना  पाहून  मनातून  रडत  होतीस  पण  चेहऱ्यावर  तुझ्या  हसू  होत ,
मला  वाटत  होत  तू  नाराज  आहेस
पण  त्या  वेळी  तुला  कोणी  विचारले  नसेल ,
"तू  खुश  आहेस  ना ..."
आता  विचारतो  सांग  ना
आई  तू  खारच  खुश  आहेस  का ?

आता  मला  हा  प्रश्न  खरच  तुला  विचारायचा   आहे ,
पण  कसे  विचारू  काळत  नाही ,
तोंडातून  शब्द  फुटत  नाही ,
मला  फार  रडू  येत  आहे ,

मला  पुन्हा  जवळ  घेशील  का ?
मला  पुन्हा  आपल्या  हाताने  मायेचा  घास  भारावशील  का ?
मला  पुन्हा  बोट  पकडून  ह्या  गर्दीतून  सुरक्षित  ठेवशील  ना ?
मला  ह्या  गर्दीत  जगन  नकोस  झालय ,
डोक्यावर  हाथ  ठेवून  लढ्याची  हिम्मत  देशील  ना ?

आणि  शेवटचा  प्रश्न ,
हे  सर्व  करताना ,
आई  तू  खारच  खुश  आहेस  का ?