Tuesday, 18 October 2011

वाट पाहत आहे ...

वाट  पाहत  आहे ...

प्रिये  ये  ना माझ्या  बरोबर ,
माझी  साथीदार  बनून ,
माझे  डोळे  आता  पाणावले  आहेत ,
मी  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!
रात्रीला  दिवसाची  ओढ  असेल  हि ,
चंद्राला  ताऱ्यांची  सोबत  असेल  हि ,
पण  मला  आता  हृदयात  काही  टोचत  आहे ,
माझे  हृदय  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

तू  होतीस  तर  माझे  ओठ  थरथरत  न्हवते ,
माझा  श्वास  कधी  तुटत  न्हवता ,
मीही  कधी  हसायला  विसरलो  न्हवतो ,
माझे  जुने  हसणे  आता  मला  जमतही नाही ,
ते  हसणे  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

तू  मला  जगायला  हि  शिकवले  होतेस ,
आणि  तूच  मला  स्वप्न  हि  पाहायला  शिकवले  होतेस ,
तूच  माझे  भास  होतीस  आणि  तूच  माझी  सावली  हि  होतीस ,
माझी  तीच  सावली  आता  माझ्या  जवळही  फिरकत  नाही ,
हि  सावली  हि  तुझी  खूप  वाट  पाहत  आहे ...!

प्रिये  ये  ना  माझ्या  बरोबर ,
माझी  साथीदार  बनून ,
माझ्या  डोळ्यात  आता  अश्रू ही  साठत  नाही ,
गालावर  सध्या  रडण्याच्या  खुणा  हि  होत  नाही ,
आता  मी  तुझ्या  आयुष्यात  नसेल  हि ,
पण  फक्त  मला  जागवायला  तरी  येशील  ना ...
सांग    ना ...!