तिच्या साठी मी झुराव तरी किती ,
तिच्या साठी मी तडपाव तरी किती ,
तिला न बोलता ,न सांगता ,
तिच्या साठी मी मराव तरी किती ...!
तिच्यासाठी ह्या डोळ्यांना रड्वाव तरी किती ,
तिच्या साठी ह्या श्वासाला अडवाव तरी किती ,
तिच्या एका हाकेला अमृत मानणारा मी ,
ह्या अमृता साठी तरसणार तरी किती ...!
तिच्या डोळ्यातच आसमंत बघणारा मी ,
तिच्या शब्दात स्वर्ग अनुभवणारा मी ,
तिच्या शिवाय विचारात हि दुसरे काही नाही ,
तिच्या विचारांना शब्दात गुंफावे तरी किती ...!
तीच जणू माझ्या नसात वाहत आहे ,
तीच माझ्या प्रत्येक अणु रेणूत आहे ,
तीच माझ्या वर राज्य करत आहे ,
तिची हि हुकुमशाही सहन करावी तरी किती ...!
अता ती नाही मिळाली तरी चालेल ,
ती माझ्या आयुष्यातून हरवली तरी चालेल ,
तिच्यावर माझा हक्क तरी काय पण ,
तस तिच्या शिवाय मी जगणार तरी किती...!