बर वाटत ना आपलं म्हणून कोणी असणारं ,
आपल्या बाजूस कोणी बसणारं ,
आपल्याशी खूप खूप गप्पा मारणारं,
आपल्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणारं...!
बर वाटत ना आपल्यासाठी कोणीतरी डब्बा भरून आणणारं ,
आपल्यासाठी कुठेतरी वाट पाहत थांबणारं ,
आपण केलेली खोडी चुपचाप सहन करणारं,
आणि आपणास कायम सांभाळून घेणारं...!
बर वाटत ना आपलं नाव कोणीतरी हातावर लिहीणारं ,
आपल्याला स्वप्नात पाहून गालात हसणारं ,
आपण रडताना आपल्यासाठी खांदा पुढे करणारं,
आणि आपण हसताना आपल्या बरोबर हसणारं...!
बर वाटत ना आपल्या साठी कोणीतरी झुरणारं,
आपल्या सुखात त्याचा आनंद लुटणारं,
दुखात आपला वाटेकरी असणारं ,
आणि आपल्यावर आपल्या पेक्षा जास्त हक्क सांगणारं...!
ते कोणी इतके हवे हवेसे कसे वाटावे ,
त्या कोणी विचारात येऊन रडायला का लावावे,
ह्या हृदयाला त्या कोणाची एवढी ओढ का असावी,
ह्या वेड्या मनाला त्याची एवढी गरज का वाटावी...!

No comments:
Post a Comment