तुझा चेहरा हसरा असेलही,
तुझ्या डोळ्यात आसमंत दिसेलही,
फुलातही असशील कळीसारखी कधीतरी,
लाजतही असशील कधीतरी,
नाकही तू मुरडत असशील,
नजरेनं हजारोंना घायाळही करत असशील...
तूच तुझ्यात कधीतरी हरवली असशील,
तूच तुला आरश्यात पाहून भारावली असशील,
प्रेमाचा अंकुर तुझ्याही मनात कधीतरी फुलाला असेल,
तुझ्याही स्वप्नात कोणी खास राजकुमार असेल...!
तसा मीही काही कमी नाही,
माझे हि जीवन राजकुमारा पेक्षा वेगळे नाही,
मीही भरारी मारतो उंच आकाशात,
मीही गुंततो कधी कधी माझ्याच विचारात,
माझ्याही हातावर कोणाच्या तरी रेषा लिहिल्या आहेत ,
मनाला न पटणाऱ्या प्रेमाच्या अशा व्यथा आहेत..!
मी जरी तुझा खास मित्र असेल,
तुझ्या हि स्वप्नात मी कधी स्थान मिळवले असेल,
माझ्या साठी तुही कधी तरी गाणे गायले असेल,
मीही तुला कधी तरी हसवलेही असेल,
मीही आणेन तुझ्यासाठी चंद्र तोडून,
मीही देईन तुला ताऱ्यांचा गजरा करून...!
एकदा तरी माझ्या वाटेवर तू चालशील,
माझ्या बरोबर माझ्यात मिसळशील,
एकदा तरी माझा हात तू हातात घेशील,
उशिरा का असेना पण तू जरूर माझी होशील...!

Sahi re Mitra...
ReplyDeletethanks Mitra....!
ReplyDeletelike !!!
ReplyDeletethanks sankalp
ReplyDelete