Wednesday, 23 May 2012

बरस रे एकदा पावसा..!

उभा का असा तू शांत दूरवर,
का राग तुझा ह्या रानावर,
काय चूक अमुची कळेल का आम्हा,
नाही घडणार ती आता पुन्हा पुन्हा..!

रात्र आणि दिवस हि राबाव आम्ही,
चटणी आणि भाकरी साठी तरसतात तान्ही,
का असा आमच्यावरच राग हा तुझा,
का आमुच्या मानागुटावर पाय हा तुझा..!

राजाने नुसता हुकुम सोडवा,
गुलामाने नुसता तो झेलावा,
आम्ही कधी मेलो त्याला किंमतच नाही,
रडायला ह्या डोळ्यात आता पाणीसुद्धा नाही..!

सूर्य रोज अमुच्या वरी आग ओकणार,
रानात राबून आमच रक्त आटणार,
कस कुठ काहीतरी थोडस उगवणार,
आणि मग त्याला फक्त कवडीच मिळणार...!

आमच्या मुलांनी शाळेत जायचे नाही,
दिवाळी तर दूर कधी सुट्टी घ्यायची नाही,
त्यांनीही पोटाला उपाशी राहायचे,
त्यांनीही रडत रडत दिवस काढायचे..!

मर्जी नक्की तुझी काय हे तरी सांग,
दिलेल्या बळींना एकदा तरी जाग,
अजून किती शेतकऱ्याचे तू हाल करणार,
केलेली पाप तू तरी कुठ फेडणार..!

कधी तरी आमची सुद्धा कीव येऊ दे,
कधी तरी आम्हा हि सुख लाभू दे,
पड कधी तरी आमच्या मनासारखा,
रानालाही भेटू दे त्याचा जिवलग सखा...!
तू जरा बरसलास तर फार बर होईल,
ह्या वर्षी तरी शेतकरी तूप पोळी खाईल,
त्यांच्याही जीवाला शांत होऊ दे,
तुलाही थोडफार पुण्य मिळू दे..!

Tuesday, 22 May 2012

अनोळखी ती...!

अनोळखी ती एकदा स्वप्नात आली,
गालांवर तिच्या होती थोडी लाली,
तिचे डोळे होते जरा निळे,
केस हि जणू रात्रीसारखे काळे..!

हळूच जवळ येऊन ती बसली,
हळुवार गालात स्मित ती हसली,
ओठ तिचे जरा थरथरले,
रूप तिचे माझ्या डोळ्यात भरले..!

न काही बोलता ती तशीच बसून होती,
जराशी मला मनातून उदास वाटत होती,
थोडावेळ माझ्या हाताशी ती खेळली,
मी काही बोलणार त्या आधीच ती वळली..!

हळूच तिच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले,
हुंदक्यांचे बाण काळजात घुसायला लागले,
रडण्याचे कारण मलाही कळत न्हवते,
मी काय करावे काही सुचतच न्हवते..!

पहिल्यांदा कोणी मुलगी माझ्या समोर अशी रडत होती,
अश्रूंची जणू एक सरच पडत होती,
शब्द हि तेव्हा सुचतच न्हवते,
मनात नको नको ते विचार येत होते..!

नंतर काही वेळाने ती जरा थांबली,
मी विचारले तू का रडली?,
म्हणे मला जरा एकटे वाटत होते,
आठवणींचे काहूर उरी दाटत होते..
कोणीतरी असेल मला रडू देणार म्हणून इथे आले,
आणि पाहून तुला मला रडूच आले,
का असे करतोस माझ्याशी तू,
का अस वागतोस माझ्याशी तू..!

रडली रडली आणि हळूच ती उठली,
माझ्याकडे पहात डोळे पुसतच गेली,
मला तर हे काही कळतच न्हवते,
अनोळखी हिला मी कधी पाहिलेही न्हवते,
तरीही हि अशी का बोलून गेली,
सांगता सांगता अशी गायबच का झाली..?

अजून हि ती माझ्या स्वप्नात येते,
रोज असेच काहीसे बोलून जाते,
मीही आता जास्त मनावर घेत नाही,
आणि तीहि मला कधी अशी बाहेर भेटत नाही...!