Tuesday, 22 May 2012

अनोळखी ती...!

अनोळखी ती एकदा स्वप्नात आली,
गालांवर तिच्या होती थोडी लाली,
तिचे डोळे होते जरा निळे,
केस हि जणू रात्रीसारखे काळे..!

हळूच जवळ येऊन ती बसली,
हळुवार गालात स्मित ती हसली,
ओठ तिचे जरा थरथरले,
रूप तिचे माझ्या डोळ्यात भरले..!

न काही बोलता ती तशीच बसून होती,
जराशी मला मनातून उदास वाटत होती,
थोडावेळ माझ्या हाताशी ती खेळली,
मी काही बोलणार त्या आधीच ती वळली..!

हळूच तिच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले,
हुंदक्यांचे बाण काळजात घुसायला लागले,
रडण्याचे कारण मलाही कळत न्हवते,
मी काय करावे काही सुचतच न्हवते..!

पहिल्यांदा कोणी मुलगी माझ्या समोर अशी रडत होती,
अश्रूंची जणू एक सरच पडत होती,
शब्द हि तेव्हा सुचतच न्हवते,
मनात नको नको ते विचार येत होते..!

नंतर काही वेळाने ती जरा थांबली,
मी विचारले तू का रडली?,
म्हणे मला जरा एकटे वाटत होते,
आठवणींचे काहूर उरी दाटत होते..
कोणीतरी असेल मला रडू देणार म्हणून इथे आले,
आणि पाहून तुला मला रडूच आले,
का असे करतोस माझ्याशी तू,
का अस वागतोस माझ्याशी तू..!

रडली रडली आणि हळूच ती उठली,
माझ्याकडे पहात डोळे पुसतच गेली,
मला तर हे काही कळतच न्हवते,
अनोळखी हिला मी कधी पाहिलेही न्हवते,
तरीही हि अशी का बोलून गेली,
सांगता सांगता अशी गायबच का झाली..?

अजून हि ती माझ्या स्वप्नात येते,
रोज असेच काहीसे बोलून जाते,
मीही आता जास्त मनावर घेत नाही,
आणि तीहि मला कधी अशी बाहेर भेटत नाही...!

11 comments:

  1. Lay manje lay manje layeech bhariiii!!!!!
    Awesome!!!!! Superlike!!!!

    ReplyDelete
  2. लय म्हणजे लय म्हणजे लयीच भारी!!!!!!!! अप्रतिम!!!!!

    ReplyDelete
  3. mast re amol..khrach aavadali..

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. Sahi re Amol mast aahe poem..!!

    ReplyDelete
  6. Amol Ek Number Bhava!!! Jinkalays kiiii...... :-)

    ReplyDelete
  7. chan ahe tuzi kavita.....amol

    ReplyDelete