Tuesday, 11 September 2012

माफी

आज ती माझ्यावर न माहित का रुसली,
रुसली तर रुसली पण अबोल हि झाली,
जाताना कामावर माझ्याकडे पाहिलेही नाही,
पाहणे तर दूरच साधी जाते हि म्हटली नाही...!

तिचे ते वागणे जरा मला अजबच वाटले,
चुकले काय माझे हे शोधण्यात मन रमले,
शोधता शोधता तिचा फोन जसा आला,
बोलण्याऐवजी ती रडत असल्याचा भास झाला...!

रडत होती हुंदके देत,आणि काहीसे पुटपुटत हि होती,
म्हणे वरती स्वर्गातच बनतात हि हवीहवीशी नाती,
तू विसरला असशील मला,मी नाही विसरले,
तू जागा आहेस पाहून मीहि रात्ररात्र जागले...!

आज मी तुझ्यावर चिडले तर तुला अजीब वाटत आहे,
असे तुझे रुसवे फुगवे मी रोज सहन करत आहे,
मला तुझ्या हृदयातली ती जागा परत हवी,
स्वप्न साकारायची आहेत मला त्यात नवी नवी...!

असे काहीसे बोलून तिने फोनच ठेवला,
अन माझ्या विचारांचा मात्र डोहच फुटला,
खरच मी इतका स्वार्थी झालोय का,
माझ्या आयुष्यातून तिला मी गमावलाय का?

ती चिडली होती माझ्यावर हे मी पाहिलेच नाही,
लक्ष तिच्या बोलणाऱ्या  डोळ्यांवर कधी गेलेच नाही,
ती आली होती जवळ मला कळावे तिचे भाव म्हणून,
पण माझ्या हृदयाने मला त्यावेळी साधच दिली नाही...!

आली जेव्हा परत घरी तेव्हा स्वतःहून ती हसली,
राग आणि रागाचे ते कारण ती आठ तासात विसरली,
मीही कधी ते कारण शोधायचा अट्टाहास केला नाही,
तिचा तो राग मला परत कधी अनुभावायाचाही नाही...!

ती जे काही बोलली फोन वर ते सारखे कानात घुमत होते,
एकूण एक शब्द सारखे हृदयात टोचत होते,
मी चुकलो होतो ते मला कळले होते,
पण माफी मागण्यास पाय पुढे पडतच न्हवते...!

बोलूच ह्या विचाराने तिच्या जवळ मी गेलो,
न थांबता न बघता एका दमात सर्व बोललो,
ते पाहून ती एकदम खुदकन हसतच बोलली,
अरे वेड्या माफी तू मागतोयेस तरी कसली...!

हि तुझी चुकी नाही आणि माझी हि नाही,
फक्त सांगते एकच मी तुझ्याशिवाय नाही आणि तू माझ्याशिवाय नाही..!
तू असाच मला रोज मनापासून हसवत राहा,
आणि माझ्यासाठी असच प्रेम वाढवत राहा...!

Tuesday, 4 September 2012

परी आहे ती

परी आहे ती सुंदर स्वप्ने दाखवणारी,
स्वप्नातही मनातून हसवणारी,
स्वप्नांच्या पल्याड नेऊन स्वप्नातही स्वप्ने पाहायला लावणारी...!

तिचे बोलणे अगदी फुलासारखे आहे,
अलगद,नाजूक आणि सुरेख से,
शब्द तर वेगळाच असा सुगंध घेऊन दरवळतात,
आणि थेट हृदयाला जाऊन भिडतात...!

हसते ती जेव्हा जेव्हा चांदणे पसरते दारी,
चंद्राची एक कोर बनते लाजताना तिच्या कपाळावरी,
वाटे त्या पसरलेल्या चांदण्यात मस्त एक रपेट मारावी,
मारताना ती रपेट तीही माझ्या बरोबर असावी..!

डोळे तिचे जणू एक अथांग सागर,
हरवावे मी त्यात जाऊन दूरवर,
आवडेल मला त्यात राहायला आणि जगायला,
मस्त त्या सागरात आणि तिच्यात शांत बसायला..!

पण भीती वाटते तेव्हढी तिच्या अश्रूंची,
आणि त्या अश्रू वाहणाऱ्या वाटेची,
मिळालीच त्यांना जर बाहेर जायची वाट,
वाहून नेईन मलाही ती भयानशी भावनेची लाट..!

नाही जायचे मला बाहेर ह्या परीच्या राज्यातून,
त्या कधीही न संपव वाटणाऱ्या सुंदरश्या स्वप्नातून,
ती अशीच असावी समोर माझ्या आणि तिने फक्त हसावे,
हसताच हळूच तिने पुन्हा दूरवर चांदणे पसरावे...!