Sunday, 14 October 2012

प्रियसी

किती सुंदर असत ना आयुष्यात प्रियसी असण,
प्रियासी म्हणून तिच्यावर आपला हक़्क़ सांगण...!

तिच्या डोळ्यात हरवण आणि आपल्यातच तिला शोधण,
तिची थोडी थट्टा करण आणि तिच्याकडून आपली थट्टा करून घेण...!

आपण कितीही शहाणे असलो तरी तिने वेडोबा म्हणायची वाट पाहण,
आणि तिने ते म्हटल्यावर हळूच तिच्या समोर लाजण...!

तिच्या हसण्याची वाट पाहण,आणि ते डोळ्यात साठवण,
ती रडली कि तिची समजूत काढण,आणि समजावता समजावता हळूच रडून घेण..!

तिच्या येण्याची रोज वाट पाहण,आणि आली कि तिच्या वर रागवण,
आणि थोड्या वेळात तो राग विसरून तिच्याशी गप्पा मारत बसण...!

तिने प्रेमाने आपल्या डोक्यावरून हात फिरवण,
आणि त्या स्पर्शागणिक अलगत तुटलेल्या पानासारख तिच्याबरोबर वाहत जाण...!

तिच्या समोर थोडे नखरे करण,आणि तिला नखरे करताना पाहत बसण,
तिचा एक एक नखरा नंतर आठवत एकट्यानेच हसण...!

कधी एकांतात रमणार मन आज तिच्यात रमत,
कधी श्वासागणिक धकधकणार हृदय आज तिच्या मूळ चालत..,
किती सुंदर असत ना आयुष्यात प्रियसी असण,
प्रियासी म्हणून तिच्यावर आपला हक़्क़ सांगण...!