आज तिला पाहिलं खूप दिवसानंतर मनमुराद हसताना,
हसताना तिची सारी दु:खे पचवताना,
मी चकित झालो थोडासा तिच्याकडे पाहून,
पण जरा बर वाटलं तिला हसताना पाहायला ...
काही दिवसांपासून आमची विचार वेगळे होत होते,
शब्दांना खूप विरुध्द फाटे फुटत होते,
आज मीच थोडा प्रयत्न केला सर्व विसरायचा,
नव्याने पुन्हा सुरवात करायचा,
मी चकित झालो थोडासा माझ्यातील बदलावर ,
पण जरा बर वाटलं तिला हसताना पाहायला ...
तिला काही विचारले तर ती काही बोलतच न्हवती,
मनातले खुपणे कधी सांगतच न्हवती,
काही बोलण्याआधीच तिचे डोळे खूप काही बोलून जायचे,
आज मीच थोडा प्रयत्न केला तिचे डोळे मनापासून वाचण्याचा,
मी चकित झालो तिच्या त्या भावना वाचून,
पण जरा बर वाटलं शेवटी तिला हसताना पाहायला ..